आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल! 10 तोळ्यांमध्ये थेट ₹22,400 ची वाढ; जाणून घ्या नवीन किंमत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : आठवड्याची सुरुवात सोनं-चांदीच्या बाजारात मोठ्या धक्क्याने झाली आहे. काही दिवसांपासून सोन्याचे दर खाली येतील, अशी आशा बाळगून असलेल्या ग्राहकांची आज चांगलीच निराशा झाली. आज सोमवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून, १० तोळे सोनं थेट २२,४०० रुपयांनी महागलं आहे. सोन्यासोबतच चांदीनेही आज नवा उच्चांक गाठल्याने लग्नसराई, सणासुदीच्या तयारीत असलेल्या सामान्य ग्राहकांच्या खिशावर ताण वाढला आहे.

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल ₹२,२४० ची वाढ झाली असून आज १ तोळा सोनं खरेदीसाठी ₹१,५८,८४० मोजावे लागणार आहेत. रविवारी हेच सोनं ₹१,५६,६०० दराने विकले जात होते. त्यामुळे केवळ एका दिवसातच सोन्याने मोठी उडी घेतल्याचं स्पष्ट होत आहे. १० तोळ्यांचा विचार केला तर आज २४ कॅरेट सोनं ₹१५,८८,४०० वर पोहोचलं असून रविवारी हा दर ₹१५,६६,००० इतका होता.

२२ कॅरेट सोन्याच्या दरातही आज मोठी वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ₹२,०५० ची वाढ झाली असून १ तोळा सोनं ₹१,४५,६०० वर पोहोचलं आहे. रविवारी हेच सोनं ₹१,४४,५५० दराने विकले जात होते. १० तोळ्यांचा दर पाहिला तर आज २२ कॅरेट सोनं ₹१४,५६,००० इतकं महागलं आहे. काही दिवसांपूर्वी किंमत स्थिर होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आजच्या वाढीने त्या अंदाजांनाच छेद दिला आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दरही आज वाढले आहेत. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ₹१,६८० ची वाढ झाली असून आज हा दर ₹१,१९,१३० इतका आहे. रविवारी १८ कॅरेट सोनं ₹१,१७,४५० वर होते. १० तोळ्यांचा दर पाहता आज १८ कॅरेट सोनं ₹११,९१,३०० वर पोहोचलं असून एका दिवसातच ₹१६,८०० ची वाढ नोंदवली गेली आहे.

सोन्यापाठोपाठ चांदीनेही आज मोठी उसळी घेतली आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ₹१५ ची वाढ झाली असून १ ग्रॅम चांदीसाठी ₹३०० मोजावे लागत आहेत. त्यामुळे १ किलो चांदीचा दर थेट ₹१५,००० ने वाढून ₹३,००,००० वर पोहोचला आहे. चांदीच्या वाढलेल्या दरांमुळे भांडी, दागिने खरेदी करणाऱ्यांनाही आज मोठा फटका बसला आहे. Gold Price Today

दरम्यान, वेगवेगळ्या शहरांमध्ये आज १ ग्रॅम सोन्याचे दरही वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबाद येथे १ ग्रॅम सोनं ₹१५,८८४ दराने विकलं जात आहे. दिल्लीमध्ये हा दर ₹१५,६७४ असून चेन्नईत सर्वाधिक ₹१५,९८२ आहे. अहमदाबादमध्ये १ ग्रॅम सोन्याचा दर ₹१५,६६४ इतका नोंदवण्यात आला आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरमधील चढ-उतार आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोनं-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे आज सोनं किंवा चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर वाढलेल्या दरांचा विचार करूनच निर्णय घेणं शहाणपणाचं ठरेल. सोन्याची चकाकी वाढली असली, तरी सामान्य माणसाच्या बजेटवर मात्र आज या चकाकीची मोठी झळ बसल्याचं चित्र आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल! 10 तोळ्यांमध्ये थेट ₹22,400 ची वाढ; जाणून घ्या नवीन किंमत”

Leave a Comment