Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! सोनं 5 हजारांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: सोनं-चांदी खरेदीची वाट पाहणाऱ्यांसाठी आज दिलासादायक बातमी समोर आली आहे. काल अचानक वाढलेले सोनं-चांदीचे दर आज जोरदार घसरले असून सराफा बाजारात मोठी नरमाई पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भू-राजकीय तणाव कमी झाल्याने आणि गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्यामुळे आज फ्युचर्ससह स्थानिक बाजारातही सोनं-चांदी स्वस्त झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसोबतच लग्नसराईची तयारी करणाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आलं आहे.

आज दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. Goodreturns च्या आकडेवारीनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,54,570 रुपयांवर आला आहे. तर दागिन्यांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचा दरही 4,600 रुपयांनी कमी होऊन 1,41,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सलग काही दिवसांच्या तेजी नंतर आलेली ही घसरण लक्षवेधी मानली जात आहे.

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी घट झाली आहे. आज चांदी प्रति किलो तब्बल 20 हजार रुपयांनी स्वस्त झाली असून राजधानी दिल्लीच्या बाजारात सकाळी चांदीचा भाव 3 लाख रुपये प्रति किलो इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्येही चांदीचे दर दिल्लीप्रमाणेच आहेत. कालपर्यंत उसळलेले दर आज अचानक खाली आल्याने गुंतवणूकदार थोडे सावध झाले आहेत.

कमोडिटी बाजाराबद्दल बोलायचं झालं तर MCX वरही आज घसरणीचं चित्र दिसून आलं. एप्रिल गोल्ड फ्युचर्समध्ये सुमारे 2 टक्क्यांची घसरण होत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,50,383 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर मार्च सिल्वर फ्युचर्समध्ये तब्बल 6 टक्क्यांची घसरण झाली असून आज सकाळी चांदीचा दर प्रति किलो 2,52,719 रुपये इतका आहे. नफा वसुलीचा थेट परिणाम फ्युचर्स बाजारावर झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

महाराष्ट्रातही आज सोनं-चांदीच्या दरात घट झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगावसारख्या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,54,420 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,550 रुपये प्रति तोळा इतका असून प्रति ग्रॅम दर 14,155 रुपयांच्या आसपास आहे. राज्यभरात आज चांदीचा भावही 20 हजारांनी कमी होऊन प्रति किलो 3 लाख रुपये झाला आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची हालचाल आणि जागतिक राजकीय परिस्थिती यावर सोनं-चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार आहे. सध्या आलेली ही घसरण खरेदीसाठी चांगली संधी मानली जात असून ग्राहकांनी दरांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला बाजारातील जाणकारांकडून दिला जात आहे. Gold Rate Today

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment