Havaman Andaj news : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या कडाक्याची थंडी, बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या थंडी जवळपास गायब झाली असून, सकाळ-संध्याकाळ हलकी गार हवा आणि दुपारी चांगलाच उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होत असून, कधी ढगाळ वातावरण तर कधी अचानक पावसाच्या सरी असा अनुभव नागरिक घेत आहेत. Havaman Andaj news
राज्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून दुपारच्या वेळी उकाडा अधिक जाणवणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात जाणवलेली थंडी जानेवारीतच ओसरली आणि फेब्रुवारी महिन्यात तर उकाड्यासोबतच पावसाचं वातावरण तयार झालं आहे. या सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाचे आजार वाढताना दिसत आहेत.
राज्यातील तापमानात मोठे चढउतार नोंदवले जात आहेत. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमान 10.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर रत्नागिरीत उच्चांकी तापमान 34.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. एकाच राज्यात इतका मोठा तापमानातील फरक जाणवत असल्याने शेतकरी, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं असून काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Havaman Andaj news
दरम्यान, मुंबई आणि परिसरात वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील प्रदूषणात सातत्याने वाढ होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेले रुग्ण अधिक त्रस्त झाले आहेत. आजही दिवसभर तापमानात चढउतार, ढगाळ वातावरण आणि दुपारचा उकाडा अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उत्तर भारतात मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून गुलमर्ग, रोहतांग, कुल्लू आणि मनालीसारख्या उंच भागांमध्ये 5 ते 16 सेंटीमीटरपर्यंत नवीन बर्फ साचला आहे. हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळच्या वेळेस दृश्यमानता शून्यावर आली असून दाट धुक्यामुळे वाहतूक आणि जनजीवन ठप्प झालं आहे. अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीमुळे शाळा आणि
महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
राजस्थानमध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट नोंदवण्यात आली असून पूर्व राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुकं आणि थंड वाऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टी सुरू असताना, महाराष्ट्रात मात्र उकाडा आणि पावसाचं मिश्र वातावरण असल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत.
एकीकडे थंडी दुसरीकडे उकाडा आणि मध्येच पावसाची शक्यता अशी ही बदलती हवामान परिस्थिती पुढील काही दिवस राज्यात कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
हे पण वाचा : लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकत्र मिळणार; फक्त याच महिलांना मिळणार लाभ..
1 thought on “हवामानात मोठा बदल; राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता”