Ladki Bahin Yojana News: राज्यातील लाखो महिलांसाठी सध्या एकच चर्चा सुरू आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? घरात किराण्याचा खर्च वाढलाय, मुलांच्या शाळेच्या फीची वेळ जवळ आली आहे, तर काही ठिकाणी गॅस सिलिंडरचे पैसे बाकी आहेत. अशा वेळी दर महिन्याला मिळणारे ₹१५०० हे अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरतात. पण यावेळी फेब्रुवारी महिना संपत आला तरीही अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही, त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. Ladki Bahin Yojana News
मागील वेळी जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता पुढे ढकलला गेला आहे. आता प्रशासनाकडून अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, फेब्रुवारीचा ₹१५०० चा हप्ता मार्च महिन्यात दिला जाऊ शकतो. म्हणजेच महिलांच्या खात्यात या महिन्यात कधीही रक्कम जमा होऊ शकते. मात्र अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
दरम्यान, गावागावात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. यावेळी दोन हप्ते एकत्र येणार का? कारण यापूर्वी एकदा दोन महिन्यांचे हप्ते एकाच महिन्यात जमा झाले होते. त्याच धर्तीवर फेब्रुवारी आणि मार्चचे ₹१५००-₹१५०० असे एकूण ₹३००० रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक महिला बँकेच्या मेसेजकडे डोळे लावून बसल्या आहेत.
सोलापूरसारख्या भागात काही महिलांनी सांगितले की, दर महिन्याचा हा पैसा घरखर्चासाठी खूप उपयोगी पडतो. दोन हप्ते एकत्र आले तर थोडी उसंत मिळेल. पण अजूनपर्यंत सरकारकडून याबाबत स्पष्ट घोषणा झालेली नाही. अधिकृत आदेश आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो आहे. अनेक महिलांच्या केवायसीमध्ये (KYC) चुका आढळल्या आहेत. आधार लिंक नसणे, बँक खात्यात नावातील फरक किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे काही लाभार्थ्यांचे हप्ते डिसेंबरपासून रखडलेले आहेत. अशा महिलांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे चारही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मार्च महिन्यात केवायसी दुरुस्त करण्याची अंतिम संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. ज्यांनी अद्याप बँकेत जाऊन आधार लिंकिंग किंवा माहिती अपडेट केलेली नाही, त्यांनी तातडीने ती प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा हप्ता उशिरा मिळू शकतो.
एकंदरीत पाहता, फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. तसेच फेब्रुवारी-मार्चचे मिळून ₹३००० एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. मात्र, अधिकृत घोषणा येईपर्यंत निश्चित तारीख सांगता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग आणि केवायसी स्थिती तपासून ठेवावी, म्हणजे पैसे आल्यावर कोणतीही अडचण येणार नाही.