रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! महाराष्ट्रातील या शहरातून धावणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातून थेट देशाची राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात मोठी हालचाल सुरू झाली असून, ही मागणी थेट राज्यसभेत उपस्थित करण्यात आली आहे. पुणे–दिल्ली दरम्यान वेगवान, आधुनिक आणि प्रीमियम रेल्वे सेवा सुरू व्हावी, यासाठी आता जोरदार पाठपुरावा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. Maharashtra Railway News

सध्या पुणे ते दिल्ली या अतिशय महत्त्वाच्या आणि व्यस्त लोहमार्गावर एकही स्वतंत्र, वातानुकूलित आणि उच्चगती प्रीमियम रेल्वे सेवा उपलब्ध नाही. हीच बाब लक्षात घेत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेच्या शून्यप्रहरात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे थेट मागणी केली. पुणे–दिल्ली मार्गावर वंदे भारत स्लीपर, राजधानी एक्सप्रेस किंवा तेजससारखी आधुनिक ट्रेन तातडीने सुरू करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, पुणे हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचे शहर आहे. ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाणारे पुणे हे शिक्षण, संशोधन, आयटी, स्टार्टअप, ऑटोमोबाईल आणि संरक्षण क्षेत्राचे मोठे केंद्र आहे. येथे नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था, संरक्षण उद्योग आणि केंद्र सरकारशी संबंधित अनेक कार्यालये कार्यरत आहेत. येथील संरक्षण कॉरिडॉरही लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे.

व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि प्रशासकीय कामकाजासाठी दररोज हजारो प्रवासी पुणे ते दिल्ली प्रवास करतात. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्यांचा प्रवास २० ते ३० तासांचा आहे. या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असून सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, अधिकारी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

थेट प्रीमियम रेल्वे सेवा नसल्यामुळे अनेक प्रवाशांना मुंबईमार्गे प्रवास करावा लागतो किंवा जुन्या, संथ गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. यामुळे वेळेचा तसेच पैशांचाही मोठा अपव्यय होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. वेगाने विकसित होणाऱ्या पुण्यासाठी दिल्लीशी थेट, जलद आणि आरामदायी रेल्वे सेवा ही आता काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

जर पुणे–दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर एक्सप्रेससारखी आधुनिक ट्रेन सुरू झाली, तर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांना मिळतील. तसेच दिल्लीहून पुण्यात येणाऱ्या अधिकारी, व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि पर्यटकांनाही मोठा फायदा होणार आहे.

त्यामुळे पुणे शहराला प्रीमियम रेल्वे सेवेचा दर्जा मिळावा आणि महाराष्ट्र–दिल्ली थेट वेगवान रेल्वेने जोडले जावे, यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी राज्यसभेत करण्यात आली आहे. आता रेल्वे मंत्रालय या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment