या भागात होणार अतिमुसळधार पाऊस अवकाळी पावसाचा मोठा हाय अलर्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Update : राज्यासह देशातील हवामान सध्या अक्षरशः गोंधळलेलं दिसत आहे. ऐन फेब्रुवारी महिन्यात कधी थंडी, कधी उकाडा तर कधी पावसाचे ढग अशी परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रात आज संमिश्र हवामानाचा अनुभव नागरिकांना येणार आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील काही राज्यांमध्ये थेट अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून त्याचे अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही जाणवण्याची शक्यता आहे. Maharashtra Weather Update

राज्यातून थंडी जवळपास गायब झाल्यासारखी वाटत असतानाच पुन्हा एकदा तापमानात घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून येथे किमान तापमान 10.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. सकाळच्या वेळेत गारठा जाणवत असला तरी दुपारच्या सुमारास मात्र उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. दुपारच्या तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक भागांत आज ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईसह कोकण पट्ट्यात हवामानाचा वेगळाच रंग पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळेत धुरकट वातावरण जाणवत असून दृष्यमानतेवर स्पष्ट परिणाम होताना दिसतोय. मुंबईत हवेचा गुणवत्ता निर्देशांक पुन्हा एकदा वाईट श्रेणीत पोहोचला असून आज तो थेट 204 वर गेला आहे. पीएम 10 चे प्रमाण 180 तर पीएम 2.5 चे प्रमाण 151 वर पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुपारच्या वेळेत मात्र आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान 35 अंशांच्या आसपास राहणार असल्याने उकाडाही चांगलाच जाणवणार आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी 48 तासांत राज्यातील किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होऊ शकते. त्यामुळे पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. काही भागांत थंडीची लाट तर काही ठिकाणी अचानक उन्हाचा तडाखा वाढेल, असा अंदाज आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सध्या नागरिकही संभ्रमात पडले असून आजारपणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

दरम्यान, देशातील इतर राज्यांमध्ये हवामान अधिक तीव्र होताना दिसत आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवण्यात आले असून काही भागांत मुसळधार पावसाचा थेट इशारा देण्यात आला आहे. कुठे कडाक्याची थंडी, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे थेट उकाडा असा विचित्र हवामानाचा खेळ देशभर सुरू आहे.

एकूणच हवामानातील हे सततचे बदल शेती, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस सतर्क राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून दिला जात असून हवामानाच्या ताज्या अपडेटकडे लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.

Leave a Comment