PM Kisan 22nd Installment Date | माझ्या शेतकरी भावांनो, सध्या आपल्या डोळ्यासमोर एकच प्रश्न आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता नेमका कधी जमा होणार? ऊन-वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता मातीत घाम गाळणाऱ्या माझ्या कष्टकरी बापाला शेतीसाठी चार पैसे हातात असावेत, म्हणून केंद्र सरकारने २०१९ मध्ये ही ‘पीएम किसान’ योजना सुरू केली. वर्षाला ६००० रुपये जरी मिळत असले, तरी पेरणीच्या किंवा खतांच्या वेळेस हे दोन हजार रुपये शेतकऱ्याला मोठा आधार देतात. आतापर्यंत आपल्या खात्यात २१ हप्ते जमा झाले आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून २२ व्या हप्त्याची वाट बघून बळीराजाचा डोळा सरकारी घोषणेकडे लागला आहे.
१३ मार्चला काय घडणार?
आता जी माहिती समोर येतेय, ती वाचून तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. मीडिया रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ मार्च रोजी आसामच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथल्या कोकराझारमध्ये ते अनेक विकासकामांचे भूमिपूजन करतील. चर्चा अशी रंगली आहे की, याच शुभमुहूर्तावर मोदी साहेब देशातील करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २२ व्या हप्त्याचे बटण दाबू शकतात. जर १३ मार्चला हे पैसे जाहीर झाले, तर ऐन मार्च महिन्यात जेव्हा शेतीची कामं सुरू असतात, तेव्हा हा मदतीचा हात तुम्हाला मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने अजून या तारखेवर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही, ही फक्त एक दाट शक्यता आहे. त्यामुळे सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आपण लक्ष ठेवून आहोत. PM Kisan 22nd Installment Date
पण सावधान! हे काम केलं नसेल तर पैसे अडकतील
भावांनो, सरकारने आता या योजनेत मोठा बदल केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आता फक्त आधार कार्ड असून चालणार नाही, तर तुम्हाला तुमचं ‘शेतकरी ओळखपत्र’ (Farmer ID) काढावं लागणार आहे. सरकारला असं वाटतंय की, या योजनेचा फायदा खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यालाच मिळावा, म्हणून हा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नसेल, त्यांचे पुढचे हप्ते अडकू शकतात. अनेकवेळा काही लोक चुकीच्या पद्धतीने पैसे लाटतात, अशांना चाप लावण्यासाठी आणि तुमच्या हक्काचे पैसे तुम्हालाच मिळावे म्हणून हे ओळखपत्र बंधनकारक केलं आहे.
त्यामुळे माझ्या शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अजून हे ओळखपत्र काढलं नसेल, तर वेळीच काढून घ्या. जशी काही नवीन अपडेट येईल, तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. हा लेख आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल.