पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या दिवशी मिळणार; शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana 22th Installment Updates: देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधारवड ठरलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेती करताना वाढता खर्च, खत-बी-बियाण्यांचे दर, अनियमित पाऊस आणि बाजारातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असते. अशा वेळी वर्षाला मिळणारे ६००० रुपये अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरतात. आतापर्यंत २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून आता सर्वांचे लक्ष २२व्या हप्त्याकडे लागले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी आसाममधील Kokrajhar येथे दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात विविध विकासकामांची घोषणा होणार असून त्याच मंचावरून पीएम किसानचा २२वा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे ही केवळ शक्यता मानली जात आहे.

२०१९ साली सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता २००० रुपयांचा असतो आणि तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. मागील २१वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आला होता. त्यामुळे आता चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आल्याने शेतकरी २२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, सरकारने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नसेल, त्यांचे हप्ते अडकू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोंदणी, डुप्लिकेट नावे आणि चुकीचे दावे रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळेल, असा सरकारचा दावा आहे.

सध्या तरी शेतकऱ्यांनी अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक आहे. आपल्या बँक खात्याची माहिती, आधार लिंकिंग आणि आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. मार्च महिन्यात २२वा हप्ता जाहीर झाल्यास लाखो शेतकऱ्यांच्या घरात पुन्हा एकदा दिलास्याचे वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. PM Kisan Yojana 22th Installment Updates

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment