Pm Kisan Yojana news: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता असताना अनेक शेतकऱ्यांसाठी मात्र चिंतेची बाब समोर आली आहे. कारण राज्यातील आणि देशातील हजारो शेतकऱ्यांना यंदाचा हप्ता मिळणार नाही, अशी स्पष्ट माहिती आता प्रशासनाकडून पुढे येत आहे. कागदोपत्री चुका, अर्धवट प्रक्रिया आणि चुकीची माहिती यामुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. Pm Kisan Yojana news
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसे थेट अडकणार आहेत. अनेक गावांमध्ये अजूनही काही शेतकरी eKYC कडे दुर्लक्ष करत आहेत, तर काहींनी प्रक्रिया सुरू केली असली तरी ती अर्धवट सोडलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना २२ वा हप्ता मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय भू-सत्यापन म्हणजेच जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. काही शेतकऱ्यांनी भू-सत्यापन अजिबात केलेले नाही, तर काहींची माहिती अपुरी किंवा चुकीची असल्यामुळे अर्ज प्रलंबित अवस्थेत आहेत. या कारणामुळेही हप्ता रोखला जाणार आहे.
बँक खात्याशी संबंधित चुकादेखील अनेक शेतकऱ्यांसाठी अडचणीचं कारण ठरत आहेत. चुकीचा बँक खाते क्रमांक, IFSC कोडमधील लहानशी चूक, किंवा खातं बंद असणं – या कारणांमुळे देखील पीएम किसानचे पैसे खात्यावर जमा होणार नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात याआधीही पैसे परत गेलेले असून, तरीही दुरुस्ती न केल्याने आता पुन्हा अडचण येत आहे.
शेतकऱ्याच्या नावातील स्पेलिंगची चूक, आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव जुळत नसणे, आधार क्रमांक चुकीचा टाकलेला असणे, किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसणे – या सर्व तांत्रिक कारणांमुळे देखील २२ वा हप्ता थांबवला जाणार आहे. अनेक शेतकरी सगळं केलंय असं म्हणतात, पण एका छोट्याशा चुकामुळे संपूर्ण रक्कम अडकते, हे वास्तव आहे.
म्हणूनच प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर तातडीने eKYC पूर्ण करा, भू-सत्यापन तपासा, बँक खात्याची माहिती दुरुस्त करा आणि आधारशी संबंधित सर्व तपशील जुळतोय का हे खात्री करून घ्या. वेळेत दुरुस्ती केली नाही, तर २२ वा हप्ता हातातून निसटू शकतो.
एकूणच शेतकऱ्यांच्या खात्यात येणारे हे पैसे लहान वाटत असले तरी शेतीच्या कामासाठी खत-बियाण्यासाठी आणि घरखर्चासाठी मोठा आधार ठरतात. त्यामुळे आता उशीर न करता प्रत्येक शेतकऱ्याने आपली कागदपत्रे तपासून योग्य ती दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे, असं कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.
हे पण वाचा : या तारखेला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कृषी मंत्री यांची मोठी घोषणा!