लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! काहींना ₹1500 तर काहींना थेट ₹4500 मिळणार; कधी जमा होणार? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंता होती. फेब्रुवारी महिना सुरू झाला असतानाच आता या योजनेबाबत महत्त्वाची माहिती पुढे येत आहे. काही महिलांना नेहमीप्रमाणे ₹१५०० मिळणार असून, तर काही महिलांच्या खात्यात तीन महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजेच ₹४५०० जमा होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचा लाभ सुरुवातीपासून सुरू आहे आणि ज्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली आहे, अशा पात्र महिलांना योजनेचा नियमित हप्ता मिळणार आहे. या महिलांची कागदपत्रे आणि माहिती योग्य असल्यामुळे त्यांचा लाभ पुढेही सुरू राहणार असून त्यांना ₹१५०० रुपये मिळणार आहेत. मात्र, ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही किंवा माहिती अपूर्ण आहे, अशा महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.

दरम्यान, अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. ई-केवायसीदरम्यान चुकीची माहिती भरली जाणे, बँक खात्याशी संबंधित अडचणी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे हे हप्ते रखडले होते. आता या सर्व प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची माहिती तपासणार आहेत.

प्रत्यक्ष पडताळणीत जेवढ्या महिला पात्र ठरतील, त्यांना तीन महिन्यांचे रखडलेले पैसे एकत्र दिले जाणार आहेत. त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात थेट ₹४५०० जमा होण्याची शक्यता आहे. पात्र असूनही पैसे न मिळालेल्या महिलांसाठी ही बाब मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. Ladki Bahin Yojana

जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी पूर्ण केली असेल, तुमची माहिती योग्य असेल आणि सर्व निकषांमध्ये बसत असाल, तर तुम्हाला तुमचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. थोडा उशीर झाला असला तरी पात्र महिलांना लाभ दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच वाट पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment