या तारखेला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कृषी मंत्री यांची मोठी घोषणा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत आता निर्णय झालेला असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी लागू होईल, असे थेट विधान कृषीमंत्री दत्तात्र्य भरणे यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून, त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. Agriculture News

भरणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच निर्णय घेतलेला आहे. सध्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक माहिती संकलनाचे काम सुरू आहे. ही सर्व माहिती एप्रिलपूर्वी पूर्ण होणार असून, त्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे.

कृषीमंत्र्यांनी सांगितले की, परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, आगामी अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी किती तरतूद असेल, याबाबतही त्यांनी महत्त्वाचे संकेत दिले. भरणे म्हणाले की, अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी मर्यादित तरतूद असू शकते, मात्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द नक्की पाळला जाईल. मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी त्यांनी राजकीय घडामोडींवरही भूमिका स्पष्ट केली. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची राष्ट्रीय जबाबदारी घ्यावी, अशी काही आमदारांची भावना असली तरी तेराव्या दिवसानंतरच सर्व वरिष्ठ नेते आणि आमदार एकत्र बसून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या पवार कुटुंब दुःखात असल्याने या विषयावर आत्ता चर्चा करणे योग्य नाही, अशी भूमिका भरणे यांनी मांडली.

भरणे म्हणाले की, त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असून, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत असा विश्वास त्यांना दिला आहे. या भेटीत कोणताही राजकीय विषय झाला नसून, केवळ अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. राज्य, देश आणि पक्षाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, इंदापूर तालुक्याबाबत बोलताना भरणे यांनी सांगितले की, इंदापूरची जनता हुशार आहे, ती केवळ भाषणांना किंवा प्रचाराला भुलत नाही. तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरील सर्व उमेदवार निवडून येतील, असा ठाम दावा त्यांनी केला.

एकूणच, शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने आता स्पष्ट दिशा दिली असून, ३० जूनपूर्वी कर्जमाफी मिळेल या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता एप्रिलमधील समिती अहवाल आणि अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

हे पण वाचा : नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार; लाभार्थी यादीत नाव तपासा

1 thought on “या तारखेला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कृषी मंत्री यांची मोठी घोषणा!”

Leave a Comment