दिलासादायक बातमी ! सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण; नवीन दर एकदा पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate News: गेल्या काही दिवसांपासून महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आणि लग्नसराईकडे पाहणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये थोडी स्थिरता येताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मागील काही आठवड्यांपासून उच्चांक गाठणारे दर आता खाली येऊ लागल्याने बाजारात खरेदीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. Gold Rate News

जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीवर होत असल्याने मागील वर्षभरात या मौल्यवान धातूंमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. कधी युद्धजन्य परिस्थिती, कधी व्याजदरांचे अंदाज तर कधी डॉलरची हालचाल या सगळ्यांचा परिणाम थेट बाजारावर दिसून आला. मात्र आता भू-राजकीय तणाव काही प्रमाणात कमी झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीची मागणी घटताना दिसत आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे १ लाख ५२ हजार ३०० रुपयांच्या आसपास स्थिर राहिला. दुपारच्या सत्रात काही काळ दरात चढउतार दिसून आले आणि सुमारे १ हजार रुपयांहून अधिक वाढीनंतर दर १ लाख ४८ हजार ८८९ रुपयांवर स्थिरावला. दुसरीकडे, चांदीच्या दरांवर मात्र विक्रीचा दबाव कायम राहिला. व्यवहाराच्या सुरुवातीला दर घसरले, मध्ये थोडी सुधारणा झाली, पण शेवटी पुन्हा घसरण होत चांदीचा दर प्रति किलो सुमारे २ लाख ३९ हजार रुपयांपर्यंत खाली आला.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या दरांनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५१ हजार ४८९ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवण्यात आला, तर चांदीचा दर २ लाख ४१ हजार १८४ रुपये प्रति किलो इतका राहिला. या घसरणीमुळे दागिने खरेदी करणाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

या घसरणीमागचं मोठं कारण म्हणजे जागतिक राजकीय तणावात आलेली घट. ऑगमाँट रिसर्चच्या प्रमुख डॉ. रेनिशा चेनानी यांच्या मते, इराण आणि अमेरिका यांच्यात ओमानमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे संघर्षाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे पाहणाऱ्या गुंतवणूकदारांनी थोडं सावध पवित्रा घेतला असून बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात चांदीचं स्थानही बदललं आहे. एमसीएक्सवर दर घसरल्याने चांदी आता जागतिक बाजारात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. कंपनिजमार्केटकॅपच्या आकडेवारीनुसार चांदीचं बाजार भांडवल सुमारे ४.१७ ट्रिलियन डॉलरवर आलं असून, ते एनव्हिडियाच्या मागे गेलं आहे. सोनं मात्र अजूनही ३४ ट्रिलियन डॉलरहून अधिक बाजार भांडवलासह अव्वल स्थानावर कायम आहे.

दर घसरण्यामागे अमेरिकेतील रोजगार बाजाराची कमकुवत आकडेवारी हेदेखील एक महत्त्वाचं कारण मानलं जात आहे. जानेवारी महिन्यात नोकरी कपातींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बेरोजगारी भत्त्याच्या अर्जातही वाढ झाली आहे. यामुळे अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह जूनपासून व्याजदर कपात करू शकते, असा अंदाज बळावत आहे आणि त्याचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर होत आहे.

तज्ज्ञांच्या मते, पुढील काळात सोनं प्रति १० ग्रॅम १.४० ते १.६० लाख रुपयांच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता आहे, तर चांदी २.२५ ते २.८५ लाख रुपये प्रति किलो या पट्ट्यात व्यवहार करू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घसरणीच्या काळात खरेदी आणि दर वाढले की विक्री अशी रणनीती अवलंबावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

एकूणच, जागतिक राजकीय स्थैर्याचा थेट फायदा आता सोन्या-चांदीच्या बाजारात दिसू लागला असून, पुढील काही दिवस हे खरेदीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात, असं बाजार जाणकार सांगत आहेत.

Leave a Comment