शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! या दिवशी खात्यात एकदम ₹6,000 जमा होणार? पहा काय आहे नवीन अपडेट्स..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना, खत-बियाण्यांचे दर वाढत असताना आणि हवामानाची अनिश्चितता कायम असताना सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत हीच अनेक कुटुंबांसाठी आधार ठरते. अशातच फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी तब्बल ₹६००० रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना यांचे हप्ते एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. जर असे झाले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना म्हणजे काय?

केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ₹६००० दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यांत म्हणजेच दर चार महिन्यांनी ₹२००० अशा स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेतदेखील शेतकऱ्यांना वर्षाला ₹६००० दिले जातात. म्हणजेच दोन्ही योजना मिळून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ₹१२,००० रुपयांची मदत मिळते.

फेब्रुवारीत हप्ते एकत्र येणार का?

पीएम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला होता. नियमानुसार पुढील हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित आहे. दरम्यान, नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता अद्याप काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. PM Kisan Yojana

माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. म्हणजेच नमो शेतकरीचे ₹४००० आणि पीएम किसानचे ₹२००० असे मिळून एकूण ₹६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अर्थात, याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्रशासनस्तरावर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिकांसाठी शेतकरी खर्च करत आहेत. अशावेळी खात्यात थेट पैसे जमा झाले तर खत, औषधे, मजुरी किंवा घरखर्चासाठी ही रक्कम उपयोगी पडणार आहे. गावागावात शेतकऱ्यांमध्ये याच चर्चेला उधाण आले आहे – “यावेळी पैसे एकदम येणार का?” अनेक शेतकरी बँकेत चौकशी करताना दिसत आहेत.

eKYC अनिवार्य – अन्यथा हप्ता अडकणार

महत्त्वाची बाब म्हणजे पीएम किसान योजनेसाठी eKYC अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप eKYC पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही. eKYC करण्यासाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांकाद्वारे प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तसेच जवळच्या CSC सेंटरवरही हे काम करता येते.

पैसे कधी येणार?

सध्या शेतकऱ्यांमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे. “नेमके पैसे कधी जमा होणार?” अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासनाकडून अधिकृत घोषणा होताच याबाबत स्पष्टता येईल. Beneficiary Status

सरकारकडून मिळणारी ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार आहे. मात्र पात्रता, आधार लिंकिंग, बँक खाते सक्रिय असणे आणि eKYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. थोडीशी चूक झाली तरी हप्ता अडकू शकतो.

म्हणूनच सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी एकदा आपली माहिती तपासून घ्यावी. योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण असल्यास फेब्रुवारी महिन्यात खात्यात ₹६००० जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या मेहनतीला थोडासा आर्थिक हातभार लागला, तरीही त्यातून नव्या आशेची पेरणी होते… आता सर्वांच्या नजरा पुढील हप्त्याकडे लागल्या आहेत.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment