राज्यावर मोठं संकट! 7 जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट जरी; पुढील 24 तासात या भागात होणार अवकाळी पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj: राज्यातील हवामानाने अक्षरशः कोडं घातलं आहे. सकाळी गारवा, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी ढगांचा गडगडाट, अशी तिन्ही ऋतूंची एकत्रित अनुभूती नागरिक घेत आहेत. शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक सगळेच या बदलत्या वातावरणामुळे हैराण झाले आहेत. त्यातच आता भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील 24 तासांसाठी गंभीर इशारा दिल्याने चिंता आणखी वाढली आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सात जिल्ह्यांमध्ये थेट येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांवर पुन्हा संकट

आधीच अवकाळी पावसाने अनेक भागांतील रब्बी पिकांचे नुकसान केले आहे. हातात आलेले हरभरा, गहू, कांदा, द्राक्ष यांसारखी पिके पावसामुळे खराब झाली. नुकसानीची पाहणी केंद्र शासनाकडून करण्यात आली असली तरी भरपाई कधी आणि किती मिळणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडी जवळजवळ गायब झाली होती. अनेकांनी उन्हाळ्याची तयारीही सुरू केली होती. पण पुन्हा एकदा ढगांची गर्दी होत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. “वर्षभर पाऊसच आहे का?” असा प्रश्न अनेकांच्या तोंडून ऐकू येत आहे.

तापमानात मोठी तफावत

राज्यातील तापमानातही मोठी तफावत दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ते 11.6 अंश सेल्सिअस इतके होते. दुसरीकडे मुंबई मधील सांताक्रूझ येथे 36.3 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. एका बाजूला थंडीचा स्पर्श, तर दुसऱ्या बाजूला उन्हाचा चटका—अशी विचित्र परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.

प्रदूषणाचीही वाढती समस्या

दरम्यान, मुंबईसह काही मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनकरीत्या वाढली आहे. हवेत धूर, धूळ आणि आर्द्रता वाढल्याने श्वसनाच्या तक्रारी वाढत आहेत. हवामानातील सातत्याने होणारे बदल आणि प्रदूषण यांचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. Havaman Andaj

पुढील 24 तास का महत्त्वाचे?

हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की पुढील 24 तास अत्यंत निर्णायक असतील. या काळात वादळी वाऱ्याचा वेग वाढू शकतो. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, शक्य असल्यास काढणी पुढे ढकलावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, झाडांखाली उभे राहू नये आणि विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील हवामानाचा हा अनिश्चित खेळ सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत आहे. एकीकडे दुपारचे कडक ऊन अंगाला भाजत आहे, तर दुसरीकडे संध्याकाळी अचानक ढगांचा गडगडाट मनात भीती निर्माण करत आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस पडू नये म्हणून. आता सर्वांचे लक्ष पुढील 24 तासांकडे लागले आहे. हवामानाचा हा बदल नेमका किती नुकसान करणार, हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, राज्यातील प्रत्येक नागरिकाने सावध राहण्याची हीच योग्य वेळ आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment