शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी! या नागरिकांचे रेशन कार्ड होणार कायमचे बंद; तुमचंही नाव यादीत आहे का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card New Update : रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्य मिळवण्याचं साधन नसून, गरिब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आधारवड ठरणारं महत्त्वाचं शासकीय कागदपत्र आहे. या रेशन कार्डच्या माध्यमातून लाखो नागरिकांना दर महिन्याला पाच किलोपर्यंत मोफत धान्य मिळतं. मात्र आता याच रेशन कार्डाबाबत एक चिंताजनक आणि टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे.

राज्यातील सोलापूर जिल्ह्यात तब्बल २२,८०० रेशन कार्डधारकांनी मागील एक वर्षभर रेशनच उचलले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, ‘मिशन पडताळणी’ अंतर्गत या लाभार्थ्यांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. पुरवठा निरीक्षक आणि तलाठी यांच्या माध्यमातून ही पडताळणी केली जात आहे.

रेशन कार्ड बंद होण्यामागची प्रमुख कारणे

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आता सुधारली आहे. त्यामुळे त्यांना मोफत धान्याची गरज उरलेली नाही. काही कुटुंबांनी स्वतःहून रेशन घेणं थांबवलं आहे, तर अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ते दुसऱ्या शहरात किंवा जिल्ह्यात स्थायिक झाले असून, मूळ पत्त्यावरचे रेशन कार्ड अद्याप सक्रिय आहे.

याचबरोबर काही लाभार्थ्यांनी पत्ता बदलल्याची माहिती प्रशासनाला दिलेली नाही, त्यामुळे त्यांच्या नावावर असलेले रेशन कार्ड संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. अशा सर्व अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कायमचे बंद केले जाण्याची शक्यता आहे.

आधार–रेशन लिंकिंगमध्ये मोठा गोंधळ

रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेदरम्यानही मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांनी अंदाजे जन्मतारखा नोंदवल्यामुळे काही लाभार्थ्यांचे वय खूप जास्त दाखवले गेले, तर काहींचे वय १८ वर्षांखालील असल्याचे नोंदवले गेले आहे. या चुकांमुळे पात्र लाभार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून या सर्व बाबींची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.

सहा ते बारा महिने लाभ न घेणाऱ्यांवर कारवाई

महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या सहा ते बारा महिन्यांपासून रेशनचा लाभ न घेतलेल्या सर्व रेशन कार्डधारकांची विशेष पडताळणी केली जाणार आहे. या तपासणीत जे लाभार्थी अपात्र ठरतील, त्यांचे रेशन कार्ड कोणतीही सूट न देता कायमचे रद्द केले जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. Ration Card New Update

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल आणि काही महिन्यांपासून धान्य उचलले नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमची माहिती अद्ययावत आहे का, आधार लिंकिंग योग्य आहे का, पत्ता बदलला असेल तर तो नोंदवला आहे का, याची तात्काळ खात्री करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा, गरजेच्या वेळी तुमचं रेशन कार्ड बंद झाल्याचं लक्षात येऊ शकतं. ही कारवाई प्रशासनासाठी शिस्त लावणारी असली, तरी सामान्य नागरिकांसाठी ती इशारा देणारी आहे. वेळेत योग्य कागदपत्रांची पूर्तता केली, तर लाभ वाचू शकतो; अन्यथा मोफत धान्याचा हक्क कायमचा गमावण्याची वेळ येऊ शकते.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment