How to Stop Call and SMS Forwarding Code India | मुंबई/विशेष तंत्रज्ञान प्रतिनिधी: सध्याच्या डिजिटल युगात भाजीवाल्यापासून ते मोठ्या मॉलपर्यंत आपण प्रत्येक ठिकाणी मोबाईलवरूनच Google Pay, PhonePe किंवा Paytm द्वारे पेमेंट करतो. मोबाईलमुळे आपली कामे सोपी नक्कीच झाली आहेत, पण दुसऱ्या बाजूला सायबर फसवणुकीचे प्रमाणही चिंताजनक रीतीने वाढले आहे. अनेकदा आपल्याला वाटते की, “मी तर कोणालाही माझा OTP किंवा UPI पिन सांगितला नाही, मग माझे पैसे कसे गेले?”
1 लाख रुपयांचे लोन मोबाईलवरून फक्त 2 मिनिटांत बँक खात्यात जमा!
यामागचे खरे कारण असते ते म्हणजे आपल्याच मोबाईलमध्ये नकळत सुरू असलेली काही धोकादायक सेटिंग्ज! अनेकदा नवीन ॲप इन्स्टॉल करताना आपण घाईघाईत सर्व परवानग्या (Permissions) देऊन टाकतो, आणि नेमका याचाच फायदा सायबर चोरटे घेतात. जर तुम्हीही अँड्रॉइड (Android) मोबाईल वापरत असाल आणि तुमच्या मोबाईलमध्ये बँक खाते लिंक असेल, तर पुढील २ मिनिटांत ही ३ सेटिंग्ज नक्की तपासून बंद करा.
१. अनोळखी ॲप्स इन्स्टॉल होण्याची परवानगी (Install Unknown Apps):
अनेकदा व्हॉट्सॲपवर लग्नाची पत्रिका, बँकेचे केवायसी अपडेट, किंवा सरकारी योजनेची यादी या नावाखाली APK फाईल्स पाठवल्या जातात. चुकून त्यावर क्लिक झाले की, परस्पर तुमच्या मोबाईलमध्ये हॅकिंग ॲप इन्स्टॉल होते आणि तुमच्या बँकेचे मेसेज चोरले जातात.
काय कराल? मोबाईलच्या Settings मध्ये जा ➔ वर सर्च बारमध्ये Install Unknown Apps टाईप करा ➔ तिथे Chrome, WhatsApp किंवा File Manager समोर ही परवानगी ‘Allowed’ असेल, तर ती तात्काळ ‘Not Allowed’ (बंद) करा.
२. एसएमएस (SMS) आणि कॉल फॉरवर्डिंगची तपासणी:
जर तुमच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेज किंवा ओटीपी परस्पर दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड होत असतील, तर तुमचे बँक खाते धोक्यात येऊ शकते.
काय कराल? तुमच्या मोबाईलच्या डायल पॅडवर जाऊन *#21# किंवा *#62# डायल करा. जर स्क्रीनवर कोणताही अनोळखी मोबाईल नंबर फॉरवर्डिंगमध्ये दिसला, तर तात्काळ ##002# डायल करून सर्व फॉरवर्डिंग बंद करा.
३. विनाकारण दिलेली ‘Accessibility’ परवानगी:
प्ले स्टोअरच्या बाहेरून घेतलेले किंवा काही अनोळखी ॲप्स तुमच्या मोबाईलची स्क्रीन वाचण्यासाठी ‘Accessibility’ परवानगी मागतात. ही परवानगी सुरू असल्यास समोरची व्यक्ती तुम्ही कोणता पासवर्ड किंवा UPI पिन टाकताय हे पाहू शकते.
काय कराल? मोबाईलच्या Settings मध्ये जा ➔ Accessibility पर्याय निवडा ➔ तिथे ‘Downloaded Apps’ मध्ये कोणतेही अनोळखी ॲप चालू (ON) दिसल्यास ते लगेच बंद करा आणि ते ॲप मोबाईलमधून डिलीट करा.
बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी २ सोप्या सवयी:
१. Google Play Protect नेहमी सुरू ठेवा: प्ले स्टोअर उघडून तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा आणि ‘Play Protect’ मध्ये जाऊन मोबाईल स्कॅन करा. यामुळे धोकादायक ॲप्स लगेच पकडले जातात.
२. मोबाईलचे सॉफ्टवेअर अपडेट करा: कंपनीकडून येणारे सिक्युरिटी अपडेट्स वेळेवर इन्स्टॉल करा, जेणेकरून मोबाईलची सुरक्षा प्रणाली मजबूत राहते.
(ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या घरातील आई-वडील, मित्र आणि नातेवाईकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही.)