राज्यातील या 6 जिल्ह्यांतून जाणार मोठा महामार्ग! कोणत्या गावांमधून जाणार नवा रूट? यादी पाहून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News Highway : लातूर ते थेट मुंबईकडे जाणारा प्रवास आता पूर्णपणे बदलणार आहे. अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला लातूर कल्याण द्रुतगती महामार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आला असून, या प्रकल्पाला हिवाळी अधिवेशनात तत्त्वतः मंजुरी मिळाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मराठवाड्यासाठी हा महामार्ग केवळ रस्ता नसून विकासाचा नवा दरवाजा उघडणारा प्रकल्प मानला जात आहे. Maharashtra News Highway

राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या महामार्गाचे सादरीकरण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर विधानसभेत अधिकृत घोषणा झाली आणि अनेक वर्षे फाईलमध्ये अडकलेला हा प्रकल्प अखेर हलायला लागला. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच MSRDC कडून या महामार्गाच्या संरेखनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

कल्याण–लातूर ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्ग हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार असून, यामुळे मुंबई ते लातूर हा प्रवास लक्षणीयरीत्या कमी वेळेत पूर्ण होणार आहे. सध्या या प्रवासासाठी अनेक तास खर्ची पडतात, मात्र हा महामार्ग झाल्यानंतर मराठवाडा थेट मुंबई महानगराशी वेगाने जोडला जाणार आहे. उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठीही हा महामार्ग गेमचेंजर ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे हा महामार्ग नेमका कोणत्या जिल्ह्यांमधून आणि कोणत्या गावांमधून जाणार?

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा द्रुतगती महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाण्याची शक्यता आहे. सध्या तयार करण्यात आलेल्या प्राथमिक रूटनुसार हा महामार्ग उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, औसा आणि निलंगा या भागांतून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र हा रूट अंतिम नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. MSRDC कडून सल्लागारांच्या मदतीने तांत्रिक आणि आर्थिक निकषांनुसार संरेखन निश्चित केलं जाणार आहे. अंतिम अलाइनमेंट जाहीर झाल्यानंतरच कोणत्या गावातून महामार्ग जाणार कोणत्या शेतजमिनी बाधित होणार आणि नेमका रूट काय असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

दरम्यान, या महामार्गाच्या रूटवरून राजकीय हालचालीही सुरू झाल्या आहेत. धाराशीव जिल्ह्यातून हा महामार्ग जावा यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू आहे. धाराशीवचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी मांडली आहे. दुसरीकडे, बीड जिल्ह्याला वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आमदार धनंजय मुंडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

MSRDC मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरणारे संरेखनच अंतिम केलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे बीड आणि धाराशीव या दोन्ही जिल्ह्यांतील काही तालुक्यांतून हा महामार्ग जाण्याची दाट शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर लातूर–कल्याण द्रुतगती महामार्गामुळे मराठवाड्याचं मुंबईशी असलेलं अंतर फक्त किलोमीटरमध्ये नाही तर विकासाच्या दृष्टीनेही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अंतिम निर्णय जाहीर होताच या महामार्गाचा नेमका नकाशा स्पष्ट होणार असून त्याकडे आता संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलं आहे.

हे पण वाचा : दहावी परीक्षेत मोठा बदल ! आता पास होणे झाले सोपे बोर्डाचा ‘हा’ नियम वाचून पालकांनाही येईल भरून

1 thought on “राज्यातील या 6 जिल्ह्यांतून जाणार मोठा महामार्ग! कोणत्या गावांमधून जाणार नवा रूट? यादी पाहून घ्या”

Leave a Comment