biology homework helper can be especially helpful before a deadline because it helps students work through biology homework and explanations and gives students a more targeted way to work on their material.

दहावी परीक्षेत मोठा बदल ! आता पास होणे झाले सोपे बोर्डाचा ‘हा’ नियम वाचून पालकांनाही येईल भरून

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Board 10th Exam News | जिल्ह्यातील तब्बल १८८ केंद्रांवर ६४ हजार ४५४ विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक (Practical) परीक्षा सुरू होत असून, विद्यार्थ्यांमध्ये आतापासूनच परीक्षेची धावपळ आणि थोडी धाकधूक पाहायला मिळत आहे. पण यंदाच्या परीक्षेत एक अशी आनंदाची बातमी आहे, जी ऐकून विद्यार्थ्यांचा ताण नक्कीच हलका होईल.

​बऱ्याचदा विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा गणिताची भीती वाटते, पण ‘त्रिभाषा सूत्र’ (Three Language Formula) या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे वरदान ठरत आहे. या नियमामुळे आता लेखी परीक्षेत अवघे १५ ते २० गुण मिळवणारे विद्यार्थी देखील आरामात उत्तीर्ण होऊ शकणार आहेत.

​कसे आहे हे पास होण्याचे गणित?

विद्यार्थ्यांना शाळेकडून प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेत १८ ते २० गुण दिले जातात. नियमानुसार, तीन भाषा मिळून १०५ गुणांची बेरीज होणे आवश्यक असते. समजा, एखाद्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत ५ ते ७ गुण मिळाले, तरी तो पास होऊ शकतो, अट फक्त एकच की, उरलेल्या दोन भाषांमध्ये मिळून त्याची बेरीज १०५ पर्यंत पोहोचली पाहिजे. हेच गणित विज्ञान आणि गणित विषयालाही लागू आहे. गणितात १५० पैकी किमान ३८ आणि विज्ञानात १०० पैकी किमान २५ गुण मिळाले की तुमची नौका पार लागली!

​प्रशासनाचा कडक पहारा, पण विद्यार्थ्यांसाठी संधी

परीक्षा म्हटली की कॉपीचे प्रकार आलेच, पण यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात भरारी पथके तैनात असणार आहेत. त्यामुळे चुकीचे मार्ग चोखाळण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. कॉपी करताना सापडलात तर मात्र वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

​खरंतर, बोर्डाचे हे नियम पाहता विद्यार्थी सहज उत्तीर्ण होतात, पण फक्त ‘पास’ होण्यापेक्षा ‘चांगल्या गुणांनी पास’ होण्यासाठी मुलांनी आता शेवटच्या दिवसात कंबर कसली पाहिजे.

​शेवटी एकच सांगणे…

दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, तर ही एक नवीन सुरुवात आहे. ग्रामीण भागातील मुले जिद्दीने अभ्यास करत आहेत, त्यांच्या या कष्टाला बोर्डाच्या या नियमांची साथ नक्कीच मिळेल. उद्यापासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा!

1 thought on “दहावी परीक्षेत मोठा बदल ! आता पास होणे झाले सोपे बोर्डाचा ‘हा’ नियम वाचून पालकांनाही येईल भरून”

Leave a Comment